loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बस स्थानकावर उभ्या बसमधील डिझेल चोरीने खळबळ, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गोवा सीमेवर असलेल्या दोडामार्ग एस टी बस स्थानकावर शुक्रवारी रात्री उभी करून ठेवलेल्या कोल्हापूर दोडामार्ग एसटी बसमध्ये चालक वाहक झोपले असताना या बसमधील चाळीस लिटर डिझेल चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. घरासमोरील उभ्या दुचाकी वाहनातील पेट्रोल चोरणारे चोरटे आता बस स्थानकावर थांबलेल्या बसमधील डिझेल चोरी करू लागल्याने खळबळ उडाली आहे. बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटयांना चांगली संधी मिळाली आहे. डिझेल चोरीबाबत बस चालक श्रीकांत पाटील यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एस टी महामंडळ सिंधुदुर्ग विभाग आता तरी बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवतील का? हा प्रश्न पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग बस स्थानकावर शुक्रवारी रात्री कोल्हापूर दोडामार्ग बस क्रमांक एम. एच. ४६७४ चालक श्रीकांत पाटील यांनी लावून झोपी गेले होते. या बस स्थानकावर कंदबा बस, कोल्हापूर डेपोची दूसरी बस देखील होती. शनिवारी पहाटे चालक श्रीकांत पाटील यांना डिझेल टाकी उघडी दिसली त्यांनी डिझेल चेक केले असता जवळपास चाळीस लिटर डिझेल जवळपास पाच हजार रुपये डिझेल चोरी झाली. यामुळे खळबळ उडाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg