loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे येथे "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" कमिटीची सभा संपन्न

देवळे - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे शनिवार दिनांक ७ रोजी देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत "माझ गाव आरोग्य संपन्न गाव " कमिटीची सभा देवळे ग्रामपंचायत येथे संपन्न झाली. " माझं गाव संपन्न गाव " या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महिन्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनेक योजनांबाबत चर्चा करताना विशेष करून जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान गोल्डन कार्ड योजना, आभा कार्ड योजना, वयश्री योजना टी.बी.मुक्त ग्रामपंचायत, ॲनिमिया मुक्त भारत, एच.पी.व्ही. लसीकरण जनजागृती अशा विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. आरोग्य मंत्री यांच्या जनसंवाद यात्रा दौऱ्यानिमित्त कार्यक्रमाचे नियोजनबाबत चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

सदर सभेस स्थानिक जेष्ठ पत्रकार समिती सदस्य प्रकाश चाळके, पोलीस पाटील विजीत साळवी, चंद्रकांत जाधव, प्रदीपा साळवी, दर्शन साळवी, सुहासिनी सरदेशपांडे, प्रभोध आठल्ये, प्रभाकर साळवी, बाळाशेठ परशेटये, समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पाटील, संगीता सावंत, सुनील जाधव व इतर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्र देवळेचे आरोग्य सहाय्यक प्रशांत कांबळे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg