मालवण (भूषण मेतर ):मालवणात नरकचतुर्दशी निमित्त विविध बाळगोपाळ मंडळांनी बनविलेल्या नरकासुर प्रतिमांची धिंड काढून रविवारी सकाळी मालवण बंदर जेटी समुद्र किनारी त्यांचे दहन करण्यात आले. वेगवेगळ्या स्वरूपातील नरकासुर प्रतिमा तसेच बेंजो आणि डीजेच्या दणदणाटात काढलेल्या नरकासुर धिंड पाहण्यास मोठी गर्दी उसळली होती. यावर्षी मालवण पोलिसांनी धिंड काढण्यासाठी आणि बेंजो वादनासाठी मंडळाना वेळेची मर्यादा घालून देत त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याने सकाळी आठ वाजता बेंजोचा दणदणा थांबविण्यात आला व त्यानंतर मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर नरकासुर प्रतिमांचे दहन करण्यात आले.
नरकचतुर्दशी निमित्त वाईट विचार व प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी वाईट गोष्टींचे प्रतीक असणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्याची परंपरा आहे. मालवणात अलीकडच्या काही वर्षात नरकासुर दहन मोठ्या प्रमाणावर केले जाते. यात शहरातील अनेक बाळगोपाळ मंडळे आपापल्या संकल्पनेतून नरकासुराच्या आकर्षक व भव्य प्रतिमा तयार करून त्याचे दहन करतात. नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री आणि नरक चतुर्दशीच्या पहाटे बेंजोच्या तालावर नरकासुर प्रतिमांची धिंड काढण्यात येते. व त्यानंतर नरकासुर दहन करण्यात येते. यासाठी मुंबईहुन बेंजो पथके ही मागविण्यात येतात.यावर्षीही मालवणातील मंडळानी विविध स्वरूपातील नरकासुर प्रतिमा साकारल्या होत्या. भरड बॉईज, बाजार बॉईज, गाबीत वाडा, दांडी बॉईज, राजकोट, धुरीवाडा, बिग ब्रदर या व इतर मंडळानी गेले १५ - २० दिवस मेहनत घेत नरकासुर प्रतिमा साकारल्या होत्या.
नरकासुर धिंड वेळी डीजे व बेंजोच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही वर्षात येत आहेत. या पार्श्वमभूमीवर नरकासुर धिंड आणि दहन यावर यावर्षी पोलीसांनी करडी नजर ठेवली होती. नरकासुर धिंड साठी आदल्या दिवशी रात्री ११ पर्यंत आणि नरक चतुर्दशी दिवशी पहाटे ५ ते सकाळी ८ अशी वेळ पोलीसांकडून निश्चित करण्यात आली होती. या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी नरकासुर धिंड दरम्यान गस्त सुरु ठेवली होती. रात्री ११ वाजता बेंजो बंद पडल्यानंतर सकाळी देखील पोलिसांनी ८ वाजता सर्व मंडळाचे बेंजो व डीजे बंद केले.बेंजो बंद करण्यात आल्यावर मंडळानी आपापल्या नरकासुर प्रतिमा बंदर जेटी समुद्रकिंवाऱ्यावर नेऊन फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे दहन केले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस व बाळगोपाळ मंडळ यांच्यातील सहकार्याने नरकासुर धिंड व दहन कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता पार पडला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)































.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.