loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे नागनाथ मंदिरात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा दुग्धाभिषेक

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गोवा राज्याचे खासदार तथा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे येथील जागृत स्वयंभू श्री देव नागनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी धार्मिक विधी पार पाडत श्री देव नागनाथाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा करत मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही वर्षांपूर्वी कर्नाटक येथे झालेल्या अपघातातून श्रीपाद नाईक हे सुखरूप बरे व्हावेत, यासाठी त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कै. नारायण माद्रेंकर आणि संजय नाईक यांनी श्री देव नागनाथाच्या चरणी नवस केला होता. नाईक बरे झाल्यानंतर त्यांच्या हस्ते मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात येईल, असा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार हा नवस पूर्ण करण्यासाठी श्रीपाद नाईक सोमवारी मेढे नागनाथ मंदिरात दाखल झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिरात आगमन झाल्यानंतर गावातील मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धार्मिक विधी पार पाडत सोवळे परिधान करून श्री देव नागनाथाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्रीपाद नाईक यांनी दोडामार्ग तालुक्याशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. दोडामार्गमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आपला संपर्क आला. येथील माणसांनी दिलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास आपण कधीही विसरू शकत नाही. या भागातील लोकांशी आपले जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असून, येथील माणसांचे प्रेम कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. कै. नारायण माद्रेंकर यांच्यासारखे कार्यकर्ते दुसऱ्यांच्या सुख-दुःखासाठी मनापासून काम करतात. अशा चांगल्या माणसांचे योगदान आणि त्यांनी जपलेली माणुसकी विसरता येत नाही. समाजासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. गरिबी दूर करणे, प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध करून देणे तसेच देशाची आणि समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या संस्कृतीचा आणि धार्मिक परंपरांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg