loader
Breaking News
Breaking News
Foto

मार्लेश्वरमध्ये धबधब्याकडे जावू नये, असे फलक असतानाही पर्यटक का जातात?

देवरुख (वार्ताहर) - कोकणातील लोकप्रिय असलेले मार्लेश्वर देवस्थान ठिकाणी दरदिवशी श्री मार्लेश्वर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तगण व पर्यटक येत असतात. या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थानतर्फे मंदिर पायथा व धबधब्याकडे जावू नये, असे फलक लावण्यात आले आहेत. तरीही पर्यटक हा इशारा ओलांडून जातात, आणि एखादे संकट कोसळते. कालच्या घटनेनंतर हे स्पष्ट झाले आहे की, प्रतिबंध ओलांडून पर्यटक धबधब्याच्या दिशेने गेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्यात पुलाचे काम बंद आहे. ठेकेदाराने पुलाचे काम करताना सुरुंग लावले होते का? याची चौकशी व्हावी, त्यामुळे दगड कोसळले व अपघात झाला, असे काहींचे म्हणणे आहे. जर बेकायदेशीर सुरुंग लावले असतील तर तेव्हाच कोणी तक्रार का केली नाही? मग आता अपघात घडल्यानंतर बोंब मारण्यात काय हशील होणार? यात काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत असल्याचे वरकरणे दिसतेय, असे सांगितले जातेय.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg