loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथील उद्योजक अरुण विचारे यांच्या निवासस्थानी २ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजनाचा जंगी सामना

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली फाटा येथील उद्योजक अरुण नारायण विचारे यांच्या निवासस्थानी २१ दिवसीय श्री गणपती बाप्पा विराजमान झाले असून या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने रात्री ठीक ९.३० वा. श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, वरवेली फाटा येथे डबलबारी भजनाचा जंगी सामना (२० २०) आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महादेश्वर प्रा. भजन मंडळ, नाडण ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील बुवा संदिप पुजारे गुरुवर्य जयराज घाटीगावकर, पखवाज वादक संकेत राऊत, तबलावादक धीरज घाडी, विरुद्ध श्री गांवदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवलीचे बुवा संजय पवार, गुरुवर्य भगवान लोकरे, पखवाज वादक सागर कदम, तबला वादक : विनायक मोहिते यांच्यात होणार आहे. तरी या भजनाचा लाभ सर्व भजन प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन अंकेश अरुण विचारे व कुटुंबीय यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg