loader
Breaking News
Breaking News
Foto

काव्यवाचन स्पर्धेत बांद्याचा नैतिक मोरजकर राज्यात द्वितीय

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या नैतिक नीलेश मोरजकर याने ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ या राज्यस्तरीय व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून कोकणच्या साहित्यिक प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. त्याच्या ‘हासरा नाचरा पाऊस’ या कवितेने रसिकांची मने जिंकली. पुण्यातील काव्ययोग काव्यसंस्थेतर्फे आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो कवींनी सहभाग घेतला होता. नैतिकने आपल्या कवितेतून कोकणातील पावसाचे बदलते रूप, निसर्गातील चैतन्य आणि पावसामुळे खुलून येणारे निसर्गसौंदर्य प्रभावी शब्दांत मांडले. त्याच्या कल्पक लेखनाला आणि सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कवितेचा आशय, विषय, सादरीकरण आणि सोशल मीडियावरील प्रतिसाद या निकषांवर विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यात नैतिकने द्वितीय क्रमांक मिळविला. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथील अक्षरवेल सभागृहात होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात त्याला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि अक्षरधन देऊन गौरविण्यात येणार आहे. नैतिकच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg