खेड (प्रतिनिधी) : सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे योग्य प्रकारे संधारण व्हावे, या उद्देशाने नवजीवन हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि दहिवली-शिंगरी-घोगरे-किंजळे नातू ग्रामस्थ मंडळ यांच्या संकल्पनेतून न्यू मांडवे प्रकल्पाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला दोन वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पनेतून ‘मिशन बंधारा’ या जलसंधारण उपक्रमाला सुरुवात झाली. नवजीवन हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा जल फाउंडेशन कोकण विभाग, रजि. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन वाहून जाणारे पाणी अडविण्याची गरज ओळखली. त्यातूनच त्यांनी ‘मिशन बंधारा’ या उपक्रमाची संकल्पना मांडली आणि आर्थिक सहकार्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले. या आवाहनाला वरिष्ठ माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली. या उपक्रमाची संकल्पना आणि जलसंधारणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व सिड्स फाउंडेशन, मुंब्रा या संस्थेचे अध्यक्ष दिलावर चौगुले आणि सचिव सिराज चौगुले यांना सांगितल्यानंतर त्यांनी या उपक्रमासाठी २५ हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य दिले. या मदतीमुळे मिशन बंधाऱ्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची दिशा मिळाली. शिंगरी गावचे अध्यक्ष सुधाकर कदम यांनी मुंबईहून श्रमदानासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवासखर्चासाठी १० हजार रुपयांची मदत दिली. तसेच खेम कलमजाई प्रतिष्ठान आणि खेड युवा शक्ती यांनी प्रत्येकी ३ हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य केले. माजी विद्यार्थी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे दोन्ही वनराई बंधाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा आणि साधनसामग्रीचा खर्च उभारण्यात आला. यामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, प्लास्टिक आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश होता. सर्वांच्या एकजुटीमुळे जलसंधारणाच्या या उपक्रमाला बळ मिळाले. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वांच्या सहकार्याने आणि उत्स्फूर्त श्रमदानातून दिवसभर काम सुरू राहिले. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नियोजित काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, दहिवली शिंगरी किंजळे तर्फे नातू गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, आजी-माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य सुनीता कासार, जिल्हा परिषद सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानाची शाल देऊन गौरव करण्यात आला. कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजनासोबतच कार्यकर्त्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. हीच भावना जपत मिशन बंधाऱ्याच्या कामासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था बाबलिंग जंगम यांनी केली. दुपारच्या जेवणाची व्यवस्था माजी सरपंच राजेंद्र शेलार यांनी केली, तर श्रमदानादरम्यान ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसाठी फरसाण ची व्यवस्था विश्वास कदम आणि संतोष कदम यांनी केली. या सर्वांच्या सहकार्यामुळे श्रमदानात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना दिवसभर उत्साहाने काम करता आले. दोन्ही वनराई बंधाऱ्यांच्या कामाचे नेतृत्व नवजीवन हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा जल फाउंडेशन कोकण विभाग, रजि. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, माजी सरपंच राजेंद्र शेलार आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुखदेव पवार गुरुजी, बाबलिंग जंगम यांनी केले. जल फाउंडेशन कोकण विभागाच्या वतीने संस्थेचे सचिव अविनाश चव्हाण, निवे, ता. खेड हे उपस्थित होते. सिड्स फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर चौगुले आणि त्यांचे सहकारी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच खेड कोकण युवा शक्ती, पिंपरी-चिंचवड, पुणे या संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्ष श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला तसेच आर्थिक सहकार्य ही दिले.
माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, पदाधिकारी आणि दानशूर व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांतून जलसंधारणाच्या कार्याला लोकसहभागाची भक्कम जोड मिळाली. नियोजित जागेत बदल झाल्यामुळे आणि उपलब्ध वेळेच्या मर्यादेमुळे रविवारच्या दिवशी दोन्ही वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. मात्र, दुसऱ्या बंधाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची आर्थिक तरतूद करून तो पूर्ण करण्याची जबाबदारी दहिवली ग्रामस्थांवर सोपविण्यात आली. ग्रामस्थांनीही ही जबाबदारी स्वीकारली असून, उर्वरित वनराई बंधारा सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘मिशन बंधारा’ हा केवळ बंधारा बांधण्याचा उपक्रम नसून, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन केलेला सकारात्मक प्रयत्न आहे. वाहून जाणारे पाणी अडविणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करणे, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार, ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, सामाजिक संस्थांनी दिलेले आर्थिक सहकार्य आणि श्रमदानासाठी पुढे आलेले हात, हे या उपक्रमाचे खरे यश आहे. जलसंधारणाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, प्रत्यक्ष श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार! जलसंधारण ही काळाची गरज आहे आणि लोकसहभाग ही त्याची खरी ताकद आहे!







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.