loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्माण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे लोवले विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन अभियान

संगमेश्वर (प्रतिनिधी) - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जलप्रदूषण रोखण्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण महाविद्यालय, लोवले-संगमेश्वरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे लोवले येथील विसर्जन घाट व वरचे वठार परिसरात निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामपंचायत लोवलेचे ग्रामसेवक अभिनंदन पाताडे यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रशांत जाधव, वर्षा झेपले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गणेश विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात फुले, हार, दुर्वा, फळे तसेच प्लास्टिक पिशव्या, पुठ्ठे व अन्य टाकाऊ वस्तू नदीकिनारी व विसर्जन घाट परिसरात जमा होतात. हे साहित्य थेट नदीपात्रात गेल्यास जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘निर्माल्य नदीत न टाकता संकलन केंद्रात जमा करा’, असे आवाहन NSS स्वयंसेवकांनी गणेशभक्तांना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अभियानादरम्यान NSS स्वयंसेवकांनी लोवले येथील विसर्जन घाट, रस्त्याच्या कडेला तसेच परिसरातील जंगल भागात पडलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्य गोळा करून त्याचे स्वतंत्रपणे संकलन केले. विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनीही विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात निर्माल्य त्यांच्या स्वाधीन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधून निर्माल्य नदीत टाकल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती केली. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करता येते, त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

‘Not Me But You’ या NSSच्या ब्रीदवाक्यानुसार सुमारे २५ स्वयंसेवकांनी श्रमदान करत या उपक्रमात सहभाग घेतला. प्राध्यापक डॉ. खरे, प्रा. भोसले आदी उपस्थित होते. संगमेश्वर-लोवले परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक सलोखा जपला जात असताना पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. ग्रामपंचायत लोवलेचे ग्रामसेवक अभिनंदन पाताडे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg