loader
Breaking News
Breaking News
Foto

नेहमी थंड असलेल्या रत्नागिरीच्या तापमानातही काही अंशी वाढ, उन्हापासून आपणच आपली काळजी घ्यायला हवी

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - दरवर्षी ऑक्टोबर हिट जाणवत असतेच मात्र त्यासोबत सायंकाळी गडगडाटी पाऊसही पडत असतो, त्यामुळे सायंकाळनंतर वातावरणात गारवा असतो. यंदा ऑक्टोबर २०२६मध्ये उष्णता अधिक वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी परिसराचे तापमान ३१ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची स्थिती आहे. हवामान पूर्णतः सूर्यप्रकाशित असून उबदार आहे. हवामानामध्ये आद्रता ७५ टक्के इतकी आहे. वायव्येकडून ३ मैल प्रतितास वेगाने वार्‍यांचा संचार सुरु आहे. पावसाची शक्यता ० टक्के आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके आज नोंदविण्यात आले आहे. मात्र त्याची दाहकता ३७ अंश सेल्सिअस असल्याने आपल्या कोकण विभागातील राहणीमानसाठी ती जास्तच वाटते. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे अधिक उचित ठरेल. अधिक तापमानामध्ये शरिराला पाण्याची गरज असते, त्यामुळे अधिक पाणी पिणे हितावह ठरेल. ऑक्टोबर २०२६ पासून फेब्रुवारी २०२७ पर्यंत अल-निनोचा प्रभाव भारतावर राहणार आहे. त्यामुळे शासनाने देखील आता उपाय-योजनांबाबत पावले उचलली आहेत.

टाईम्स स्पेशल

१० ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये पाण्याची कपात केली जाणार आहे. तसेच जलस्त्रोत राखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. संभाव्य तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कडक पावले उचलली आहेत. नागरिकांनी व शेतकर्‍यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असून हे नैसर्गिक आव्हान पेलण्यासाठी प्रत्येकालाच मोठे योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गाव पातळीवरील नद्यांवर छोटी छोटी धरणे बांधण्याची व वाहते पाणी अडविण्याची नितांत गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg