loader
Breaking News
Breaking News
Foto

30 वे दोन दिवशीय धम्मशिबीर मंगलमय वातावरणात संपन्न

खेड - खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ रजि. अंतर्गत बौद्ध धार्मिक संस्कार समितीच्या संयुक्त विद्यमाने 30 वे धम्म शिबीर दिनांक 4 ऑक्टोबर व 5 ऑक्टोबर मोठया संख्येने धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भन्ते डॉ. करूणा ज्योती महाथेरो यांनी बुद्ध धम्म आणि आपण या विषयावर धम्म देसना दिली. भन्ते यांचे स्वागत फुलांचा वर्षाव करुन बुद्धम सरनम गछामी म्हणत वातावरण बुध्दमय करण्यात आले.. भन्ते यांनी धम्म देसना देताना म्हटले की बुद्ध धम्मात आपण कसे जीवन जगतो आहोत. सुख व दुःख पासून मुक्त व्हायाचे असेल तर शिलाचे पालन करणे आवश्यक आहे. काया, वाचा शुद्ध असली पाहिजे. बुद्ध धम्म हा मानवतावादी व विज्ञाना वर आधारित धम्म आहे.व शेवटी भन्तेना अष्टशील दान करुन मंगलमैत्रीने शेवट करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसऱ्या दिवशी सर्व बौद्धाचार्य यांनी संपूर्ण बुद्ध पूजा एक सुरात घेतली. त्यानंतर बौद्ध संस्कार समितीचे स्थानिक व मुंबई अध्यक्ष यांनी धम्मदेशना दिली व धम्म चर्चा होऊन दोन दिवशीय धम्म शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी खेड ता. बौद्ध समाज सेवा संघांचे स्थानिक व मुंबई अध्यक्ष मंदार हळदे व दीपक हळदे, महिला समिती अध्यक्ष स्वाती जाधव युवा मंच अध्यक्ष भाई पवार तसेच बौद्ध संस्कार समिती चे अध्यक्ष स्थानिक व मुबंई बौद्धचार्य हिरामण मोहिते व मनोहर तांबे,व सर्व कार्यकारिणी बहुसंख्येने बौद्ध बांधव व महिला भगिनी व बालके उपस्थित होते. सर्वाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमांस विविध शाखा, शाखाचे कार्यकरिनी गट, गटाचे कार्यकारिणी सर्व, बौद्धाचार्य मोठया संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रकारे कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सूत्रसंचालन बौद्ध संस्कार समितीचे सरचिटणीस, स्थानिक व मुंबई बौद्धाचार्य सुधीर मोहिते आणि सुरेश तांबे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg