loader
Breaking News
Breaking News
Foto

रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश बनेची सुवर्णभरारी; दोन सुवर्ण व एक कांस्यपदकाची कमाई!

चिपळूण (ओंकार रेळेकर) - राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रेयांशची दिमाखदार निवड, रेयांश पृथा पराग बने याने रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विरार येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात रेयांशने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या शानदार कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रेयांश हा ठाणे येथील युरो स्कूलचा विद्यार्थी असून, अवघ्या ११ वर्षांखालील वयोगटात त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याने गोवा, म्हैसूर, केरळ, कोलकाता, विशाखापट्टणम, झारखंड आणि मुंबई येथे झालेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये सात वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. रेयांशने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये ५४ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ७९ पदके मिळविली आहेत. इतक्या लहान वयात ७९ पदकांची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रेयांशच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

रेयांश हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल, भांडूपच्या मुख्याध्यापिका पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच महाराष्ट्रातील विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg