केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) तालुक्यातील कोंडगे गावाने अवैध दारू धंद्यांविरोधात एकजुटीचा लढा पुकारत, गावातील सर्व अवैध दारू धंदे कायमस्वरूपी बंद पाडण्यात मोठे यश मिळवले आहे. गावातील महिलांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्याला ग्रामस्थांनी दिलेल्या खंबीर साथीमुळे ग्रामसभेत दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी कोंडगे गावाचे सरपंच डाॅ.एस.व्ही कदम आणि लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी मोलाचे सहकार्य व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.यामुळे.गावाची दारूच्या विळख्यातून सुटका झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोंडगे गावात अवैध दारू धंदे सुरू होते.या धंद्यामुळे सामाजिक शांतता बिघडत चालली होती. तरुणाई व्यसनाच्या आहारी जावून कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आले होते.तर काहीना आपला जीव गमवावा लागला होता.त्पामुळे गावातील महिलांमध्ये तीव्र असंतोष होता. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी विशेष महिला ग्रामसभेत अवैध दारू धंदे बंद करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला संपूर्ण ग्रामस्थांनी आणि तरुणांनी आक्रमक पाठिंबा दिला.आणि राजरोसपणे सुरू असलेले अवैद्य धंदे कायम स्वरूपी बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.महिलांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर, कोंडगे गावाच्या सरपंच डाॅ.एस.व्ही कदम यांनी या प्रकरणात थेट लक्ष घातले. त्यांनी केवळ ठराव करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रशासकीय पातळीवर आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सरपंचांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद ठरली.ग्रामस्थांच्या या लढ्याला लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी अत्यंत सकारात्मक आणि तत्पर साथ दिली. सरपंचांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत, पीआय बगळे यांनी आपल्या पथकासह गावात कडक कारवाईचा बडगा उगारला. अवैध दारू विक्रेत्यांवर जरब बसवत त्यांनी हे धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांचे पूर्ण बळ कोंडगे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे केले.
ग्रामस्थांची वज्रमूठ, सरपंचांचे नेतृत्व आणि पोलीस प्रशासनाचे खंबीर सहकार्य यामुळे कोंडगे गाव आता अवैध दारूमुक्त झाले असून, तालुक्यात या आदर्श भूमिकेचे मोठे कौतुक होत आहे. इतर गावांनीही व्यसनमुक्तीसाठी कोंडगे गावाचा हा पॅटर्न राबवावा, अशी भावना व्यक्त होत आहे





















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.