loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळये ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू! हत्ती व वन्यप्राण्यांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

तिलारी (प्रतिनिधी) - हत्तींसह इतर वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतीचे वारंवार नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाळये ग्रामस्थांनी आजपासून (२ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. वनविभागाने हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना योग्य मोबदला द्यावा तसेच शेती-बागायतीच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम असून, वारंवार निवेदने व आंदोलने करूनही ठोस तोडगा न निघाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg