loader
Breaking News
Breaking News
Foto

एस.टी.च्या मोठ्या गाड्यांमुळे सैतवडे ग्रामस्थांचे हाल, लहान गाड्या सुरू करण्याची अब्दुल गणी खतीब यांची मागणी

रत्नागिरी (जमीर खलफे) : एस.टी. महामंडळाच्या नवीन आणि मोठ्या गाड्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सैतवडे गावातील रहिवासी आणि नियमित एस.टी. प्रवासी अब्दुल गणी खतीब यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अब्दुल गणी खतीब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नेहमी एस.टी.ने प्रवास करतात, मात्र महामंडळाने सुरू केलेल्या नव्या मोठ्या गाड्या गावात येण्यास तयार होत नाहीत. गावातील रस्ते अरुंद आणि जुन्या पद्धतीचे असल्याने या मोठ्या गाड्या रस्त्यात कुठे लागतील किंवा अडकतील या भीतीपोटी चालक आणि वाहक गाडी आत आणण्यास नकार देतात. या गाड्या गावातील पोस्ट ऑफिस या ठिकाणावरूनच थेट परत निघून जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे ग्रामस्थांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी खाजगी रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. मुख्य थांब्यापासून गावात येण्यासाठी रिक्षाला तब्बल ४० रुपये मोजावे लागतात. तसेच परत जातानाही घरापासून एस.टी. पकडण्यासाठी अतिरिक्त ४० रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे एस.टी.चा प्रवास सोयीचा होण्याऐवजी ग्रामस्थांचा नाहक आर्थिक भुर्दंड आणि त्रास वाढला आहे. याचा थेट फायदा खाजगी वाहतूकदारांना होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय या नवीन गाड्यांमधील बैठकीच्या व्यवस्थेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. गावातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या भागासाठी लहान किंवा अरुंद आकाराच्या एस.टी. गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी अब्दुल गणी खतीब यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg