loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण तालुक्यातील डांगमोडे येथे श्री देव रवळनाथ मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात सुरू

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव रवळनाथ मंदिर येथे सात दिवसांचा अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. दारूबंदीचा पुरस्कर्ता म्हणून ख्याती असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराच्या या हरीनाम सप्ताह सोहळ्यास भाविक गर्दी करत आहेत. या हरीनाम सप्ताह सोहळ्या निमित्त रवळनाथ मंदिरात अखंड हरीनाम जप सुरु आहे. तसेच विविध ठिकाणची भजन मंडळे मंदिरात येऊन आपली भजन कला सादर करून रवळनाथाची सेवा करत आहेत. यामुळे डांगमोडे गावातील वातावरण भक्तिमय व चैतन्यमय बनले आहे. या सोहळ्याची सांगता शनिवार २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ देवस्थान ट्रस्ट, मसुरे-डांगमोडे तसेच ठाकुर कुटुंबीय व डांगमोडे ग्रामस्थांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg