loader
Breaking News
Breaking News
Foto

बाळा खेडेकर यांच्या शुभहस्ते ‘तीनदा नापास तरीही...’ पुस्तकाचे प्रकाशन; अशोक सातपुते यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात

पुणे (कोथरूड) : अशोक मारुती सातपुते यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘तीनदा नापास तरीही...’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या प्रकाशन व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन पुण्यातील कोथरूड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमात युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या शुभहस्ते ‘तीनदा नापास तरीही...’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख बशीरभाई मुजावर, कर्ज निवारण संघाचे अध्यक्ष सचिवशेठ सुरा, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनंतशेठ धामोटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी अशोक सातपुते यांचा ६१ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करून त्यांना मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘तीनदा नापास तरीही...’ या पुस्तकाचे शीर्षकच अत्यंत प्रेरणादायी असून, अपयशाने खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाकडे वाटचाल करता येते, हा सकारात्मक संदेश या पुस्तकातून समाजापर्यंत पोहोचणार आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी बाळा खेडेकर यांनी अशोक सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व वैचारिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. अशा प्रेरणादायी पुस्तकांमुळे तरुण पिढीला संघर्ष करण्याची, अपयशातून शिकण्याची आणि ध्येय साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अपयशाला संधी मानून संघर्षातून यशाचा मार्ग निर्माण करणाऱ्या अशोक सातपुते यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुस्तक प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg