loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचा राजकारणापलिकडे वेगळा उपक्रम, प्रत्येक गावातील आशा सेविकेच्या घरी जाऊन भाऊबीज

वैभववाडी (प्रतिनिधी) - कोळपे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी राजकारणा पलीकडे जाऊन आपल्या मतदार संघात वेगळा उपक्रम राबविला आहे. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावातील आशा सेविकेच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आशा सेविका आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून गावातील प्रत्येकाची काळजी घेणार्‍या अशा सेविकांचे कार्य खूप मोठे आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून घेणे गरजेचे आहे. या हेतूने प्रमोद रावराणे यांनी प्रत्येक अशासेविकेच्या घरी जाऊन भाऊबीज भेट दिली. यावेळी या आशा सेविकांनी त्यांचे औक्षण करून भाऊबीज हा भाऊ बहिणीचा सण साजरा केला. रावराणे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg