loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजातील वर्षा पडये यांच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेले मंगळसूत्र मूळ मालकिणीला परत

लांजा (संजय साळवी) - बाजारात सापडलेल्या मंगळसूत्राचा मोह न ठेवता ते पोलिसांच्या स्वाधीन करणार्‍या वर्षा वसंत पडये यांच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेला आपले हरविलेले मंगळसूत्र पुन्हा मिळाले असून लांजा पोलिसांनी त्याची ओळख पटवून ते मंगळसूत्र संबंधित महिलेला परत केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी लांजाच्या आठवडा बाजारात ओजस मेडिकलसमोर वर्षा वसंत पडये (रा. कुर्णे पडयेवाडी ता. लांजा) यांना मंगळसूत्र पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ परिसरात चौकशी केली, मात्र मंगळसूत्र कोणाचे आहे याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्या ठिकाणी जवळच असणारे हॉटेल श्रीकृष्णचे मालक बाबा शिंदे यांनी लांजा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांना याबाबतची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांनी मंगळसूत्र वर्षा पडये यांच्याकडून ताब्यात घेऊन ते पोलीस ठाण्यात जमा केले. त्यानंतर विविध माध्यमांतून त्याची माहिती प्रसारित केली आणि पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर मंगळसूत्र हरविलेल्या कोचरी गुरववाडी येथील रोहिणी रविंद्र गुरव यांनी गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात रोहिणी गुरव यांनी मंगळसूत्राची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी ते मंगळसूत्र त्यांना परत केले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले आणि महिला हेड. कॉन्स्टे. रेहाना नावळेकर यांनी रोहिणी गुरव यांना मंगळसूत्र सुपूर्द केल्यानंतर स्वतःचे सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याने रोहिणी गुरव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले आणि त्यांनी पोलिसांचे आभार मानले. तर या घटनेत वर्षा पडये यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg