loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी दशेतच योग्य निर्णय घ्या, नशेपासून दूर राहा : पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव

रत्नागिरी (प्रतिनिधी) : गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाअंतर्गत खातू नाट्यमंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होत. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करावे. या वयातच योग्य निर्णय घेतलात तर तुमचे आयुष्य चांगले होणार आहे. अनेकदा मित्रमैत्रिणी सांगतात एकदा नशा करून बघ, त्याच वेळी आपण नकार दिला पाहिजे. कारण त्यावेळी होकार दिला तर आपले हे चुकीचे पाऊल तुमचे सर्व आयुष्य वाया घालवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहा, सतर्क राहा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव यांनी केले. या कार्यक्रमाला १५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अरांक्षा यादव यांनी नशामुक्ती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास पोलिस मुख्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg