loader
Breaking News
Breaking News
Foto

लोक सहभागातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचे चांगलं काम होतेय - महेश नाटेकर

आबलोली (संदेश कदम) - एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता. यंदा खूपच कमी प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने काही निर्णय घेतलेले आहेत. की लोकांना कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये. या कोकणची भौगोलिक रचना बघून अनेक ठिकाणी नदी - नाले आहेत. अशा ठिकाणी पाणी बंदिस्त केले पाहिजे. मातीचे बंधारे घातले तर त्या माध्यमातून आपल्याला पाणी अडवता येईल. आणि अडवलेलं हे पाणी जिरवता येईल आणि नक्कीच त्याचा फायदा जवळ असलेल्या विहिरी, बोरवेल अनेक ठिकाणी या पाण्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण लोकसभागातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचे चांगलं काम होतेय असा विश्वास जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वाकी नदीवर लोकसहभागातून निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने वनराई बंदरा बांधण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी बोलताना महेश नाटेकर म्हणाले की, जिल्हा परिषद च्या माध्यमातून ग्रामपंचायतीला 15 वित्त आयोगातून काही ठिकाणी आपल्याला माहित आहे की सर्वसाधारण आरएलसिने काँक्रेट केले जाते. प्रत्येक ठिकाणी अशा वेळेला बँक सुद्धा मिळताना दुर्मिळ झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने असे ठरवले की, आपण थोडसं त्यांना पंधरा वित्त आहे का तू मुदत करायला पाहिजे आणि जवळजवळ 50 हजार रुपयांची मदत 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने खर्च करायची आहे. जेणेकरून अडचणीच्या ठिकाणी जिथे माती नाही आहे. अशा ठिकाणी जेसीबीचा वापर करून त्या ठिकाणी छोटे मोठे दगड घेऊन मग त्याच्यात रेताड वगैरे भरून आपल्याला त्या ठिकाणचे पाणी अडवता येईल आणि तशाच माध्यमातून आज मी दोन-तीन ठिकाणी पाहणी केली तर उत्कृष्ट पद्धतीने लोकसहभागातून या सर्व गोष्टी होत आहेत.

टाईम्स स्पेशल

यावेळी सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्या रूपाली कदम, नम्रता निमूणकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कारेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, योगेश पालशेतकर, योगेश भोसले, समीर शिंदे, रेणुका पवार, प्रथमेश निमूणकर, प्रशांत नेटके, उदय सुर्वे आदि. उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg