दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत 'बीजांकुर' गटातर्फे मुगीज येथे भव्य कृषी माहिती केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि शासनाच्या कृषी योजनांची जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या माहिती केंद्राचे उद्घाटन पूजा तांबिटकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. माहिती केंद्रामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध विभाग आणि प्रात्यक्षिकांची शास्त्रोक्त मांडणी करण्यात आली होती:
पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जीवामृत व दशपर्णी अर्क तयार पद्धती, माती परीक्षण, कंपोस्ट खतनिर्मिती, पशुसंवर्धन, शासकीय कृषी योजना आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित पीक जातींची सविस्तर माहिती तक्त्यांद्वारे प्रदर्शित करण्यात आली. विविध पिकांची सुधारित बियाणे, जैविक खते, माहिती पुस्तिका आणि युरिया ब्रिकेट्सचे प्रदर्शन भरवून उपस्थितांना त्यांचा शेतीतील योग्य वापर प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आला. पाणी व्यवस्थापन व मृदासंधारणाचा संदेश देणाऱ्या कोकण जलकुंड, ठिबक सिंचन, समोच्च रेषांद्वारे मृदासंधारण, पावसाच्या पाण्याचे संधारण, लाखीबाग, अझोला तलाव, गांडूळखत निर्मिती आणि नाडेप खतनिर्मिती पद्धतींच्या हुबेहूब प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
या माहिती केंद्रामुळे मुगीज व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि शासकीय योजनांविषयी अत्यंत मोलाची व उपयुक्त माहिती एकाच छताखाली मिळाली. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक ज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून शाश्वत शेतीचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी बीजांकुर गटाच्या विद्यार्थ्यांनी केली. सदर प्रात्यक्षिक व माहिती केंद्र कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. रणजित महाडिक, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमाबद्दल परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी 'बीजांकुर' गटाच्या विद्यार्थ्यांचे आणि कृषी विद्यापीठाचे विशेष आभार मानले.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.