loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ पत्रकार योगेश सरावते यांना 'राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

कर्जत (जयेश जाधव) - रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार योगेश बाळू सरावते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दीर्घकालीन पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. योगेश सरावते हे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील नाना मास्तर नगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षणही कर्जत येथे झाले आहे. सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेले पत्रकार म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्यात स्वतःची ओळख निर्माण केली असून विशेषतः तरुणांमध्ये ते परिचित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरावते हे रायगड जिल्ह्यासह मुंबईतही वरिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय, नागरिकांच्या समस्या तसेच विविध घडामोडींना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले. दीर्घकाळ पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून समाजातील विविध विषय जनतेसमोर आणण्याच्या त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

जप जीवाला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सरवटे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्रात त्यांच्या सामाजिक बांधिलकी, जबाबदारीने केलेल्या कार्याचा तसेच विविध माध्यमांतून समाजाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून योगेश सरावते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg