loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहरातील शिवसेना (उबाठा)पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर कार्यालयाला भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर कार्यालयाला भेट देण्यात आली. गुहागर शहर तसेच गुहागर तालुक्यातील अनेक मार्गावरील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर चर्चा आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. गुहागर पोलीस ठाणे पासुन वरचापाट,बाग, वेलदुर पर्यंत चा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे व त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सिद्धीवियक जाधव, उपतालुका प्रमुख जयदेव मोरे, युवा शहरप्रमुख राज विखारे, तालुका ग्राहक संघ गुहागरचे अध्यक्ष विश्वनाथ रहाटे, विभाग प्रमुख पराग मालप, शाखा प्रमुख प्रभुनाथ(बाबा)देवळेकर, चंद्रकांत साळवी, पराग मोरे, चेतन जांगळी, महीला शहर प्रमुख सारीका कनगुटकर तसेच जेष्ठ शिवसैनीक शिर्के व इतर पदाधिकारी हजर होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg