loader
Breaking News
Breaking News
Foto

अ‍ॅड. वैभव खेडेकर यांना ‘आरोग्यदूत’ पुरस्काराने सन्मानित

चिपळूण (प्रतिनिधी) : समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने कोकणचे लोकनेते अ‍ॅड. वैभव खेडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘आरोग्यदूत’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅड. वैभव खेडेकर यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे तसेच आरोग्यविषयक जनजागृती करणे, अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना ‘आरोग्यदूत’ पुरस्काराने गौरविले. पुरस्काराला उत्तर देताना अ‍ॅड. वैभव खेडेकर यांनी आयोजकांचे आभार मानले. ते म्हणाले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समाजासाठी कार्य करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

टाईम्स स्पेशल

या सन्मान सोहळ्याला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय काशिद, राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील, कोकण विभाग प्रमुख रवींद्र ओकटे, पुणे विभाग प्रमुख संतोष भोसले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन बेर्डे, रत्नागिरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महादेव वाघमोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पावसकर, जिल्हा सल्लागार मोहन चव्हाण यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल अ‍ॅड. वैभव खेडेकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg