loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले विजयदुर्ग येथे गडपूजन व दीपोत्सव

देवगड (प्रतिनिधी) - गडकिल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग, यांच्यावतीने दीपावली पाडवाच्या मुहूर्तावर ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर गडपूजन व दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली ५ वर्ष विजयदुर्ग येथील किल्ल्यावर दीपोत्सव साजरा केला जात आहे. कार्यक्रमाची सुरूवात महादरवाजा पासून करण्यात आली. यावेळी फुलांनी महादरवाजा सुशोभीकरण करण्यात आला होता. किल्ल्याच्या प्रवेशव्दारापासून पणत्या लावून किल्ला सुशोभित करण्यात आला होता. देवगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील अनेक तरूण वर्ग एकत्र येऊन या उत्सवात उपस्थित राहून विजयदुर्ग किल्ल्यावर दीपोत्सव व गडपूजन उत्सव साजरा करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगड तालुका कार्यवाह महेश कानिटकर, वक्ता म्हणून ग्रामविकास मंडळ विजयदुर्ग यांचे सल्लागार आणि इतिहास संशोधक राजेंद्र परूळेकर, आनंदराव धुळपांचे नऊ वे वंशज मनोज धुळप, विजयदुर्ग किल्ल्याची पिढ्यानपिढ्या गड देवतांचे पूजन करणारे सावंत घराण्याचे प्रकाश सावंत, म्हावळुंगा गावातील समाज सेवक इतिहास प्रेमी प्रकाश राणे, इतिहास प्रेमी व समाजसेवक अशोक राणे या सर्वांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या महादरवाजाचे पूजन तसेच गडपूजन करण्यात आले. तसेच विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पीआय प्रदीप शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात विजयदुर्ग डेपो येथून पालखी किल्ल्याकडे रवाना झाली.

टाईम्स स्पेशल

यानंतर हनुमान मंदिरातून पालखी मिरवणूक लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानी माता मंदिरापर्यंत नेण्यात आली. किल्ल्यात भवानी मातेचे दर्शन घेऊन किल्ल्यात दरबार भवानी मंदिर मुख्य प्रवेशद्वारा समोर दिवे लावून सर्व किल्ला परीसर प्रकाशमय करण्यात आला होता. किल्ल्यातील आदिशक्ती श्री भवानी माता मंदिर हनुमान मंदिर येथे हार पुष्प सजावट व दिवे लावण्यात आले होते. महादरवाजा समोर रांगोळी व रंगबिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. किल्ल्यातील देवदेवतांच्या चरणी दिवे लावण्यात आले होते. पुरातत्व विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg