देवगड (प्रतिनिधी) : देवगड-विठ्ठलवाडी परिसरातून मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या प्रकाराला आळा घालून संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठलवाडी मित्र मंडळाने केली आहे. याबाबत मंडळाच्या वतीने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम बुवा आणि तहसीलदार शीतल जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. पुढील चार दिवसांत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांसाठी संबंधित प्रशासन, वाहनमालक आणि चालक जबाबदार राहतील, असा इशाराही मंडळाने दिला आहे.
देवगड-विठ्ठलवाडी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात मासे वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. मासे ताजे ठेवण्यासाठी या वाहनांमध्ये बर्फाचा वापर केला जातो. मात्र, बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा प्रकारांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ दुर्गंधीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशीही संबंधित आहे. देवगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने रस्त्यांवरील स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांसह या परिसरातून प्रवास करणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मासे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वितळलेल्या बर्फाचे पाणी रस्त्यावर सोडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रशासनाने संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. गरज पडल्यास फौजदारी कारवाईही करावी, अशी मागणी विठ्ठलवाडी मित्र मंडळाने निवेदनातून केली आहे. या निवेदनावेळी सोहम सुनील पारकर, ओमकार कुबडे, अविनाश मोहिते, शिवराम पाटणकर, विजय शिरसाट, अक्षय गिरकर, सचिन कुणकेश्वरकर, स्वप्नील पारकर, अभिषेक शिरसाट, गौरव कावले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठलवाडी परिसरातील या समस्येची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास आणि संभाव्य अपघातांच्या धोक्यापासून दिलासा द्यावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.