loader
Breaking News
Breaking News
Foto

तिडेच्या ग्राममहसूल अधिकारी सिद्धी भोईर यांची कोकण भवन येथे बदली; सन्मानपूर्वक सत्कार

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील तिडे येथील ग्राममहसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धी भोईर यांची कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अभिजीत देवळेकर यांनी सिद्धी भोईर यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढताना सांगितले की, शासकीय सेवेत काम करताना नागरिकांशी समन्वय राखणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. सिद्धी भोईर यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग नव्या कार्यस्थळावरही निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासकीय सेवेत बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवाप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक नव्या कार्यस्थळावर नव्या जबाबदाऱ्या, नवी आव्हाने आणि जनसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. सिद्धी भोईर यांनी आपल्या पुढील कार्यकाळातही कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन कायम ठेवत उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मिळालेल्या नव्या जबाबदारीतून त्यांच्या प्रशासकीय अनुभवाला अधिक व्यापक संधी मिळो, त्यांच्या कार्याचा आलेख अधिक उंचावत जावो आणि त्यांच्या हातून जनहिताची उत्तम सेवा घडो, अशा सदिच्छाही अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केल्या. यावेळी देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील,पालवणी ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे, पाचरळ ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg