loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढर येथे बंधारा बांधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी सरसावले

आबलोली (संदेश कदम) - रत्नागिरी जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंधारण करणे काळाची गरज बनले आहे. याच पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील मुंढर गावामध्ये भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. मुंढर शिरबारवाडी येथील नदीवर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे प्रमोद गांधी यांनी या बंधार्‍याच्या कामात केवळ मार्गदर्शनच केले नाही तर स्वतः हातात घमेली आणि फावडे घेऊन माती भरण्यापासून ते पाण्यात उतरून पिशव्या वाहून देण्यापर्यंतचे श्रमदान केले. हा बंधारा बांधताना मुंढर शिरबारवाडी तसेच गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनीही या कामात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. एका लोकप्रतिनिधीला आणि संपूर्ण गावाला स्वतः चिखलात-पाण्यात उतरून काम करताना पाहून सर्व स्तरांतून या सामूहिक प्रयत्नांचे प्रचंड कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

कामादरम्यान बोलताना प्रमोद गांधी यांनी गुहागर तालुका दुष्काळग्रस्त घोषित न झाल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. प्रशासन काय विचार करते यापेक्षा आम्हाला जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती माहिती आहे म्हणूनच आम्ही स्वबळावर पाणी साठवण्यासाठी असे बंधारे बांधत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg