loader
Breaking News
Breaking News
Foto

दीपक केसरकर यांच्याकडून सावंतवाडीतील व्यापाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा; लक्ष्मी-कुबेर पूजनाचे दर्शन घेऊन सुख-समृद्धीची प्रार्थना!

सावंतवाडी : दीपावलीच्या निमित्ताने लक्ष्मी-कुबेर पुजन निमित्त माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी शहरातील बाजारपेठांना भेट देत व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच व्यापारी पेठांमधील पूजन केलेल्या लक्ष्मीचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. केसरकर यांनी आपल्या निवासस्थानासह संकुलात लक्ष्मी पूजन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर उपस्थित होत्या. यानंतर केसरकर यांनी संपूर्ण शहरातील दुकानांत जात व्यापारी वर्गाला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देवी लक्ष्मीचे दर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ते म्हणाले, लक्ष्मी देवता ही समृद्धीची देवता असून नेहमी सुख-समृद्धी ही पृथ्वीतलावर लक्ष्मीच्या पावलाने येत असते. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये लक्ष्मीची कृपा असावी आणि आपले सर्व नागरिक सुखी व्हावेत. व्यापारी, बागायतदार, शेतकरी, महिला, मच्छिमार अशा सर्व घटकांना सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी देवी लक्ष्मीच्या चरणी केली. तसेच, सध्या दुष्काळामुळे आलेल्या अतिशय कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती महाराष्ट्राला देवी लक्ष्मीने द्यावी, असही साकडं घातल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, विश्वास घाग, आबा केसरकर, अर्चित पोकळे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg