loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे निर्विवाद वर्चस्व

बांदा (प्रतिनिधी) - जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा प्रशालेच्या मुलींनी आपल्या खेळाचा ठसा उमटवत घवघवीत यश संपादन केले. १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील अशा दोन्ही वयोगटांतील मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले. या दोन्ही संघांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशामुळे मडुरा हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संघांना महेश नाईक, लवू बांदेकर आणि मृणाल तोरस्कर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका जे. डी. सावंत यांच्यासह धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरस्कर, सर्व कार्यकारिणी सदस्य, समन्वय समिती सचिव रश्मी तोरस्कर, सहसचिव नंदकुमार नाईक, शालेय समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ सदस्य, माजी विद्यार्थी, मडुरा पंचक्रोशी पदाधिकारी, विकसित मडुरा ग्रुपचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

१७ वर्षांखालील संघ : उर्वशी शेरलेकर, खुशी शेगडे, स्नेहा केरकर, सानिका गावडे, श्रेया गावडे, दृष्टी सातार्डेकर, नियती मोरजकर, चैत्रा नाईक, क्लेरिसा रोड्रिक्स, काजल माधव, अलिषा गावडे. १४ वर्षांखालील संघ : अवनी रेडकर, सायली देऊलकर, संजीवनी नाईक, रीना शेळके, योगेश्वरी परब, गौतमी केणी, खुशी पाडलोस्कर, क्लेन्सी रॉड्रिक्स, ईश्वरी आंबेकर, अस्था वेंगुर्लेकर, आराध्या परब, सुविदा धुरी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg