loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाण्यात अष्टविनायक चौकातील दिवाळी उत्सव रद्द, शिंदेंसेना उत्सवावरील खर्चाचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

ठाणे (प्रतिनिधी) - सण-उत्सवांचा आनंद साजरा करताना सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचा आदर्श शिवसेनेने यंदा घालून दिला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित होणारा अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे येथील दिवाळी उत्सव यंदा त्यांच्या आदेशान्वये रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उत्सवासाठी होणारा संपूर्ण खर्च उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती शिंदेच्याशिवसेनेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक चौकात दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. आकर्षक रोषणाई, विविध कार्यक्रम आणि नागरिकांच्या सहभागामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोपरी परिसरातील नागरिकांसाठी हा उत्सव आनंदाचा आणि एकत्र येण्याचा महत्त्वाचा सोहळा ठरतो. मात्र, यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने उत्सवापेक्षा संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीचा हात देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार शिवसैनिक विविध भागांमध्ये मदतकार्य राबवत असून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि शिध्याचे वितरण करण्यात येत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू ठेवत दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

टाईम्स स्पेशल

दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो संकटात असलेल्या बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय यंदा घेण्यात आला आहे. त्यामुळे अष्टविनायक चौकातील दिवाळी उत्सवावर होणारा खर्च टाळून तो निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा रोषणाई आणि जल्लोष करण्यापेक्षा अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या घरात मदतीचा दिवा पेटविणे अधिक महत्त्वाचे आहे. आनंदाच्या सणात गरजूंच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्याचा हा प्रयत्न आहे. यंदा अष्टविनायक चौकात दिवाळीचा नेहमीचा जल्लोष दिसणार नसला, तरी दुष्काळग्रस्तांच्या घरात मदतीच्या माध्यमातून आनंदाचा दिवा पेटविण्याचा शिवसेनेचा संकल्प असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg