मालवण (प्रतिनिधी) : महावितरणच्या मालवण कार्यालयात झालेल्या नोव्हेंबर महिन्याच्या ऊर्जा मित्र बैठकीत स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव सरासरी वीज बिले, वीजपुरवठ्यातील व्यत्यय आणि भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामावरून ग्राहकांनी महावितरणच्या अधिकार्यांना जाब विचारला. ग्राहक पंचायत आणि वीज ग्राहक संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध समस्यांवर आक्रमक भूमिका घेत ग्राहकांच्या प्रश्नांबाबत अधिकार्यांना धारेवर धरले. स्मार्ट मीटर अद्याप न बसवलेल्या ग्राहकांना जाणीवपूर्वक वाढीव सरासरी वीज बिले दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
स्मार्ट मीटर बसविल्याशिवाय वाढीव बिले येत राहतील आणि बिले न भरल्यास पुढील महिन्यात आणखी वाढीव बिले आकारली जातील, अशी भूमिका अधिकार्यांकडून घेतली जात असल्याबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटर सक्तीबाबतचा नेमका आदेश दाखविण्याची मागणी केली असता अधिकारी त्याबाबत स्पष्ट आदेश सादर करू शकले नाहीत. केवळ केंद्र सरकारच्या गॅझेटचा आधार घेतला जात असल्याचे ग्राहक पंचायत प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. ग्राहकांचे समाधान होईपर्यंत या विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तारकर्ली येथील एका विश्वस्त संस्थेचा चेक केवायसीमधील त्रुटीमुळे बाऊन्स झाल्यानंतर पुन्हा चेक स्वीकारण्यास नकार देत रोख रक्कम भरण्याची सक्ती केल्याचा प्रकारही बैठकीत मांडण्यात आला.
तसेच २०२२ पासून शेतीसाठी बंद असलेला वीज मीटर बदलून देण्याबाबत अर्ज करूनही कार्यवाही झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर उपअभियंत्यांनी ’त्यावेळी मी पदावर नव्हतो, मला माहिती नाही,’ असे उत्तर दिल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्राहक पंचायतीचे मालवण शाखाध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, महिला संघटक वफा खान, जिल्हा सहसंघटक प्रमोद मोहिते, नितीन वाळके, संतोष मुणगेकर, कमलेश मांजरेकर, सुरेश बापर्डेकर, महेश काळसेकर, आप्पा चव्हाण, प्रताप बागवे, सचिन गवंडे, नंदकिशोर महाजन, मिनीन फर्नांडिस, नीळकंठ मालणकर, आनंद सावळे, सुशांत तायशेट्ये यांच्यासह अन्य ग्राहक उपस्थित होते. महावितरणतर्फे उपकार्यकारी अभियंता सचिन मेहेत्रे व अन्य अधिकारी उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.