loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड एसटी बसस्थानकातील दोन पेट्रोल पंप कोणाला देणार? थेट वाटप नको, खुली निविदा काढा -बाळा खेडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खेड (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी बसस्थानकाच्या विकासकामांतर्गत उभारण्यात आलेल्या दोन पेट्रोल पंपांच्या संचालनाचा अधिकार कोणालाही परस्पर किंवा थेट पद्धतीने न देता खुली व पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी ठाम मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपविभागीय अधिकारी खेड यांच्या मार्फत दिलेल्या या निवेदनात त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खेड बसस्थानक परिसरात दोन पेट्रोल पंप उभारण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. मात्र हे पंप कोणाच्या मालकीचे? बांधकामाचा खर्च किती? कोणत्या तेल कंपनीसोबत करार झाला? आणि सर्वात महत्वाचे - संचालनाचा अधिकार कोणाला मिळणार? याबाबत अधिकृत माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यस्तरीय निविदा क्रमांक २०२५ एमएसआरसीटी _१२४११६४_१ काढली होती, जी १७ जुलै २०२६ रोजी प्रशासकीय कारणास्तव रद्द झाल्याची नोंद आहे. मग या रद्द झालेल्या निविदेचा खेडच्या दोन पंपांशी काय संबंध आहे? पुढील प्रक्रिया काय? याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी आहे. निवेदनात शासनाकडे खालील माहिती मागितली आहे: १. दोन्ही पंपांचे बांधकाम कोणत्या योजनेअंतर्गत? मंजूर निधी आणि झालेला खर्च किती? २. जागेची मालकी एसटी महामंडळाची आहे की अन्य संस्थेची? ३. कोणत्या तेल कंपनीशी करार केला आहे? कराराची प्रत द्यावी. ४. यापूर्वी संचालनासाठी निविदा काढली आहे का? असल्यास तिची प्रत व निकाल द्यावा. ५. कोणत्याही व्यक्ती/संस्थेची संचालनासाठी निवड झाली आहे का? ६. संचालनाचे अधिकार देण्याबाबत अंतिम निर्णय काय झाला? प्रस्ताव कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे? ७. राज्यस्तरीय निविदा रद्द झाल्यानंतर खेडच्या पंपांसाठी पुढील धोरण काय?

टाईम्स स्पेशल

बाळा खेडेकर म्हणाले, आज अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसायासाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. एका सामान्य तरुणाला हा पंप मिळाला तर तो स्वतःच्या पायावर उभा राहील, १०-१५ जणांना रोजगार देईल. आमची मागणी कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही, तर सार्वजनिक मालमत्तेचा वापर पारदर्शक व्हावा आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, या जनहितासाठी आहे. या निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रांताधिकारी खेड, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एमएसआरटीसी मुंबई, विभाग नियंत्रक रत्नागिरी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg