loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्नीच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या पतीचा पन्हाळजे खाडीत मृतदेह

खेड -रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पन्हाळजे भोईवाडी येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पन्हाळजे दर्गा जेटी येथील खाडीत आढळून आला आहे. किशोर हरी मेढेकर असे या मयत व्यक्तीचे नाव असून ते शेळीपालनाचा व्यवसाय करत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर किशोर हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि ते कोणाशीही जास्त बोलत नसत. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या पूर्वी पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (B.N.S.S) कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg