loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवलीची मानवी कोळथरकर चमकणार परदेशात.. 'इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्ह फेस्ट' साठी भारताकडून प्रतिनिधित्व

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - कष्टाच्या जोरावर आणि कलेच्या पंखांनी मराठी पाऊल आज जगभरात कशा पद्धतीनं पुढे पडतंय याचं एक ज्वलंत उदाहरण समोर आलं आहे. अवघ्या कोकणवासीयांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे डोंबिवलीमध्ये राहणारी पण मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जामसुतची कन्या मानवी मंगेश कोळथरकर हिने थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका वाजवला आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध युवा उद्योजक मंगेश कोळथरकर यांची कन्या असलेल्या मानवीची बाली इंडोनेशिया येथे होणाऱ्या IIGF म्हणजेच 'इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्ह फेस्ट' या अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय डान्स कॉम्पिटिशनसाठी भारतातून निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एक उत्तम प्रोफेशनल डान्सर म्हणून तिने डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यात आधीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी तिने अनेक नामांकित जाहिरातींमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत, तर स्टार प्लस वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका 'उडने की आशा' मध्ये डान्सर म्हणून काम करून आपल्या कलेची चुणूक दाखवली आहे. नुकतीच 15 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या 'इंडियाज बिगेस्ट डान्स चॅम्पियनशिप मध्ये देखील तिची फायनलसाठी निवड झाली होती आणि आता आपल्या अद्भूत नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने थेट परदेशातील आंतरराष्ट्रीय मंचावर झेप घेतली आहे.

टाईम्स स्पेशल

बाली, इंडोनेशिया येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती आता संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोकणच्या या लाडक्या कन्येवर सध्या कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मानवीच्या या यशाने कोळथरकर कुटुंबीयांसह संपूर्ण गुहागर आणि कोकणवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg