खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ७५ शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ व त्याची फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी गेली सहा वर्षे मुंबई उच्च न्यायालयात सातत्यपूर्ण आणि जिद्दीने लढा देणारे प्रभाकर मुरलीधर कोळेकर व या न्यायालयीन लढ्यात मोलाचे कायदेशीर मार्गदर्शन करणारे ॲड. संदीप सोनटक्के यांचा चिपळूण येथे आयोजित कृतज्ञता व आनंद सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी आगाऊ वेतनवाढ मिळावी, या न्याय्य मागणीसाठी ७५ शिक्षकांनी एकत्र येत न्यायालयीन लढा उभारला होता. या लढ्याचे नेतृत्व केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी केले. तब्बल सहा वर्षे सातत्याने पाठपुरावा, न्यायालयीन प्रक्रिया आणि अनेक अडचणींवर मात करत अखेर या लढ्याला यश मिळाले. न्यायालयीन लढ्याच्या यशस्वी परिणामी सर्व ७५ शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ आणि त्यासोबत फरकाची रक्कम मिळाली. या विजयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या यशाबद्दल सहभागी शिक्षकांनी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे कृतज्ञता व आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रभाकर कोळेकर आणि ॲड. संदीप सोनटक्के यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्याबरोबरच, रत्नागिरी जिल्ह्यातील अत्युत्कृष्ट गोपनीय अहवाल असलेल्या ४५० पेक्षा अधिक शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभाकर मुरलीधर कोळेकर यांनी संघटित नेतृत्व करत सातत्यपूर्ण न्यायालयीन लढा उभारला. त्यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याला यश मिळून संबंधित शिक्षकांना एक अथवा दोन आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळवून देण्यात आला. शिक्षकांच्या हक्कांसाठी त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी, नेतृत्वक्षमता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चितच उल्लेखनीय ठरला. या न्यायालयीन लढ्यात ॲड. संदीप सोनटक्के यांनी प्रभावी कायदेशीर बाजू मांडत मोलाचे योगदान दिले आणि आपल्या सक्षम वकिलीच्या माध्यमातून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कृतज्ञता व आनंद सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन चिपळूणच्या शिक्षक टीमने केले होते. विशेषतः अरविंद भंडारी व प्रकाश गांधी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. उपस्थित शिक्षकांनी या लढ्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत प्रभाकर कोळेकर यांच्या नेतृत्वाचे आणि ॲड. संदीप सोनटक्के यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाचे कौतुक केले. हा सोहळा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून, शिक्षकांच्या एकजुटीचा, न्याय्य हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा आणि सामूहिक प्रयत्नांतून मिळालेल्या यशाचा गौरव करणारा सोहळा ठरला. सहा वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या यशाने शिक्षकांच्या संघटनशक्तीला नवी प्रेरणा मिळाली असून, उपस्थितांसाठी हा सोहळा आनंददायी व अविस्मरणीय ठरला. या सोहळ्यात चंद्रकांत पागडे, महाविर कांबळे, अशोक भालेकर, सदानंद आग्रे, दिपक ओक, सशाली मोहीते, वृषाली धाक्रस, शशिकांत बैकर इत्यादी मान्यवर शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्रसंचलन विकास महाडिक यांनी केले.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.