loader
Breaking News
Breaking News
Foto

मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'दिवाळी मेळावा' उत्साहात

रत्नागिरी - प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी. बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये दिवाळी निमित्त विद्यार्थी आणि पालकांसाठी 'दिवाळी मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय कौशल्यांमध्ये वाढ व्हावी आणि या मेळाव्यातील अनुभवाचा त्यांना भविष्यात उपयोग व्हावा या हेतूनेच हा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष प्रद्युम्न माने, संस्थेच्या व्यवस्थापिका ईशानी माने यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे प्रद्युम्न माने ईशानी माने व शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत त्याचबरोबर समूह नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले व या मेळाव्याला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघाटे व नाझिया यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध गृहोपयोगी वस्तुंचे,दिवाळीसाठी उपयुक्त वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे,खेळाचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले हॉर्स रायडिंग, कार रायडिंग हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः खरेदी - विक्रीचा अभूतपूर्व अनुभव घेतला. शाळेकडून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यात पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यातील भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहा माने यांनीही या उपक्रमासाठी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये असा उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरित्या पार पाडले. वाघाटे यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg