loader
Breaking News
Breaking News
Foto

वनपरिमंडळ लांजा, शेतकरी लाकुड व्यापारी संघटना आणि ग्रामस्थ यांच्या वतीने बांधला वनराई बंधारा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून वनपरिमंडळ लांजा व शेतकरी लाकुड व्यापारी संघटना लांजा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्ययमाने लांजा डाफळेवाडी येथे नदीवर चाळीस फूट लांबीचा बंधारा बांधला. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक साठा होण्यास मदत व्हावी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने बुधवार 28 ऑक्टोबर रोजी शासकीय यंत्रणा आणि नागरीक यांच्यातील आदर्श समन्वयातून हा जलसंधारणचा उपक्रम यशस्वी पणे राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लांजाच्या तहसिलदार प्रीयांका ढोले, लांजा सभापती मानसी आंबेकर, नगराध्यक्ष सायली कुरूप, जिल्हापरिषद सदस्य संतोष रेवाळे, नगरसेवक गुल्या नेवरेकर, वनपाल धुळू कोळेकर, सामाजिक परिक्षेत्र वनअधिकारी सोहेल शेख, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, वनपाल महादेव पाटील, शेलार, वनरक्षक शोभा हुरदुके, सिद्दार्थ हिंगारे, लांजा शेतकरी लाकुड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारूख नेवरेकर, रामचंद्र झोरे, नाजिम नेवरेकर, यशवंत घडशी, संतोष रामाणे, सुभाष लाखण, आजू बागाव, महेंद्र कांबळे, राजाराम माने, सुरेश शिंदे, प्रकाश गुरव, बाबू खानविलकर, बंडू माने, संजय पीलके, अरूण जोशी, संतोष विचारे, पांडुरंग कोलापटे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg