loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!

ठाणे, दि. ३ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा आज बी. जे. हायस्कूल सभागृह, सहावा मजला, टेंभीनाका, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाली. अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय व लोकसहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानातील उद्दिष्टे समजून घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अभियानाची अंमलबजावणी केवळ प्रशासकीय पातळीवर मर्यादित न ठेवता लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करून गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

यावेळी सिंगापूर आणि डोहाळे ग्रामपंचायतींच्या अभियानांतर्गत केलेल्या कामकाजाचे सादरीकरण संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना मिळाली. राज्य समन्वयक श्रीधर कुलकर्णी यांनीही अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, कार्यकारी अभियंता (बांधकाम) दिपाली घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे) संतोष शिरसाट, विकसित भारत – जी राम जी गटाच्या विकास अधिकारी प्राची साळसकर यांच्यासह गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg