loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी लुडबेवाडीत घरावर माड कोसळून नुकसान, नुकसानग्रस्त राऊत कुटुंबाला शिवसेनेचा मदतीचा हात

मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील वायरी लुडबेवाडी येथील श्रीमती अनिता आनंद राऊत यांच्या राहत्या घरावर माडाचे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले. ही घटना घडली त्यावेळी घरात अनिता राऊत व त्यांचा मुलगा अक्षय राऊत हे दोघेही उपस्थित होते. सुदैवाने या अपघातात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, घराचे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने नुकसानग्रस्त राऊत कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी राऊत कुटुंबाला आर्थिक मदत देत आधार दिला. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख गणेश (पप्पू) लुडबे, ओंकार तळगावकर, राहुल नरे, ऋषिकेश लुडबे, किरण तळगावकर, अरुण धामापूरकर, बाबू राऊत, वराडकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg