loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तहसिल कार्यालयात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

केळंबे-लांजा: (सिराज नेवरेकर) - राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या (विजाभज) नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि आवश्यक दाखल्यांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी लांजा तहसीलदार कार्यालय येथे नुकतेच विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या अभियान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांचे हक्क सुरक्षित करणे आणि त्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून त्यानुसार या अभियानात ४६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या विशेष मोहिमेदरम्यान नागरिकांना विविध प्रकारची शासकीय प्रमाणपत्रे व ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी व अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, लांजाचे प्रभारी मंडळ अधिकारी महादेव चव्हाण, सहाय्यक महसूल अधिकारी हरिदास पाटील, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg