loader
Breaking News
Breaking News
Foto

निकृष्ट रस्त्याचे काम हटवण्यासाठी स्वतः JCB घेऊन रस्त्यावर उतरणार!”; लवू नाईक यांचा प्रशासनाला थेट इशारा!

तिलारी (प्रतिनिधी) - “प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वतः JCB घेऊन रस्त्यावर उतरणार!” असा आक्रमक इशारा लवू नाईक यांनी दिला आहे. वायंगणतड येथील निकृष्ट रस्त्याच्या कामावरून त्यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला थेट आव्हान दिले असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी खपवून घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. वायंगणतड येथील रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे ७ ते ८ दिवस होताच रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मग रस्त्याच्या कामाचा दर्जा नेमका कुठे गेला? वापरलेल्या साहित्याची आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी झाली होती का? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी लवू नाईक यांनी दोडामार्ग तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची तांत्रिक गुणवत्ता तपासावी, नमुने घ्यावेत आणि दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करून निकृष्ट कामाची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते, दोषी ठेकेदारावर कारवाई होते का आणि निकृष्ट रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार केले जाते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अन्यथा JCB घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रत्यक्षात येणार का? हा प्रश्न चर्चेत आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg