loader
Breaking News
Breaking News
Foto

केदार पद्मावती रिक्षा चालक संघटनेच्या वतीने श्रमदानातून बुजवले रस्त्यावरील खड्डे

खेड - खेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आपेडे फाटा ते आपेडे म्हापार्लेवाडी रस्त्यावर गेले वर्षभर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्याचंच बीएसएनएलने रस्त्याची साईड पट्टी खोदून केबल टाकण्याचे काम केले होते. यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याचा मोठ्या प्रमाणात त्रास नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत केदार पद्मावती रिक्षा चालक संघटनेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे एकत्रित येत खडी व मातीचा भराव टाकून हे खड्डे बुजविण्याचे चांगले काम केले आहे. रिक्षा संघटनेच्या या सामाजिक कामाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये केदार पद्मावती रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष साळुंखे, नारायण साळुंखे, संतोष कुळे, सचिन म्हादलेकर, महेश तांबे, दिनेश साळुंखे, दिपक साळुंखे, मंगेश चव्हाण, निलेश गुरव यांनी एक पुर्ण दिवस रिक्षा धंदा बंद ठेवत मेहनत घेत प्रवाशांना होणार त्रास कमी केला आहे. याबाबत संबंधित खात्याने याची दखल घ्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष साळुंखे व सदस्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg