loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, गुहागर व ग्रामीण रुग्णालय, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर गुरुवार ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान हेच जीवनदान' या संदेशातून नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 'तुमचे रक्त, कोणाचे तरी प्राण वाचवू शकते' या भावनेतून नागरिकांनी या पावन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg