loader
Breaking News
Breaking News
Foto

जमावबंदी हटावच्या मागणीला ॲड. बंटी वणजू यांचा ठाम पाठिंबा!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार लागू करण्यात येणाऱ्या जमावबंदीच्या आदेशांमुळे सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था, धार्मिक मंडळे, व्यापारी, युवक संघटना आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील वारंवारच्या जमावबंदीविरोधात आवाज उठविणाऱ्या ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) रत्नागिरी तालुकाध्यक्ष ॲड. बंटी सदानंद वणजू यांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभर सातत्याने जमावबंदीचे आदेश लागू होत असल्याचे चित्र दिसत असून, एक आदेश संपण्यापूर्वी दुसरा आदेश लागू होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि शांततामय पद्धतीने एकत्र येण्याच्या घटनात्मक अधिकारावर मर्यादा येत असल्याची चिंता ॲड. वणजू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सरसकट निर्बंध लादणे हा नेहमीच योग्य पर्याय असू शकत नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तेथेच आवश्यक तेवढे निर्बंध लागू करावेत. मात्र सामान्य नागरिकांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व लोकशाही उपक्रमांवर विनाकारण बंधने येता कामा नयेत. "जमावबंदीचा उद्देश जनतेचे संरक्षण असावा, जनतेचा आवाज दाबणे नव्हे!" अशी ठाम भूमिका ॲड. बंटी सदानंद वणजू यांनी मांडली.

टाईम्स स्पेशल

ॲड. महेंद्र मांडवकर यांनी जमावबंदी हटविण्याबाबत घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करताना, त्यांच्या या प्रयत्नांना आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ॲड. वणजू यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या समस्या संविधानिक मार्गाने मांडता याव्यात, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. जमावबंदी हटाव, नागरिकांचे घटनात्मक स्वातंत्र्य अबाधित ठेवा आणि प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, या मागणीसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी तालुकध्यक्ष ॲड. बंटी सदानंद वणजू यांनी ठाम पाठिंबा दिला आहे !

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg