loader
Breaking News
Breaking News
Foto

स्केटिंग स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, विभागीय स्पर्धेसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी अंतर्गत स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी, तालुका, जिल्हा रत्नागिरी द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण ३ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य आणि ४ चतुर्थ क्रमांकाची पदके मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये सान्वी दरेकर, मृणाल भोसले आणि श्लोक डेरे यांनी सुवर्णपदक आरव महाडिक, हर्ष आंब्रे, अदिती लाल आणि स्वराज पवार यांनी रौप्यपदक शिवांश केकण, जय पाडलेकर, अलिशा पराकर, अन्वी मोकल आणि हेरंब लोंढे यांनी कांस्यपदक पटकावले. तसेच श्री मोरे, वरद टोंपे, फातिमा बागाकर आणि शौर्य मोडसिंग यांनी चतुर्थ क्रमांकाचे कांस्यपदक मिळवले.

टाईम्स स्पेशल

वरील यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक विजय निगडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg