loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाधिकारीही उतरल्या श्रमदानाला; मिठबावमध्ये जलसंधारणाला लोकसहभागाची साथ!

देवगड (प्रतिनिधी) - जलसंधारणाची चळवळ लोकसहभागातून अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवगड तालुक्यातील मिठबाव येथील भंडारवाडी परिसरातील ओहळावर तीन ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग घेतला. अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गट आणि विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शीतल जाधव, गट विकास अधिकारी निलेश जगताप, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांच्यासह पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, शैलेश लोके, केंद्रप्रमुख शिंदे, दिगंबर खराडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच रामेश्वर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, अध्यापक विद्यालय मिठबाव तसेच केळकर कॉलेज, देवगडच्या एन एस एस विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिला बचत गट, शेतकरी आणि ग्रामस्थांनीही श्रमदान करून जलसंधारणाच्या कामाला हातभार लावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg