चिपळूण (संतोष पिलके) : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब), चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी संचालित नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण यांच्या वतीने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘बाह्य रुग्ण तपासणी कक्ष’ उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नवीन बाह्य रुग्ण तपासणी कक्षाचे उद्घाटन शेखर निकम, आमदार, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उमेश सकपाळ, नगराध्यक्ष, चिपळूण नगरपरिषद तसेच डॉ. विनय नातू, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग समृद्ध योजना यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच या कार्यक्रमास नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब), चिपळूण जिल्हा शाखेचे अध्यक्ष निलेश मुरण, भरत नांदगावकर, नयन साडवेकर, डॉ. पुरुषोत्तम नारकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सर्व कार्यकारिणी सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. नगरसेविका राणी महाडिक यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. नॅब आय हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू आहे. नव्याने सुरू करण्यात आलेला बाह्य रुग्ण तपासणी कक्ष नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नेत्र तपासणी व आवश्यक उपचार सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) चिपळूण जिल्हा शाखेच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू नागरिकांना नेत्रविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले कार्य निश्चितच समाजोपयोगी व प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते उद्घाटन, नगराध्यक्ष उमेश सकपाळ व डॉ. विनय नातू यांच्या उपस्थितीत तसेच संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि नगरसेविका राणी महाडिक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब), चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरीच्या पदाधिकारी व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.