रत्नागिरी ( प्रतिनिधी ): रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये यावर्षीही सालाबादप्रमाणे घटस्थापना रवि. दि. ११ ऑक्टो. पासून नवरात्रोत्सवाला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. हा नवरात्रोत्सव विजयादशमी मंगळ. दि. २० ऑक्टो. पर्यंत असून दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. रत्नागिरीतील श्रीराम मंदिराचे प्रांगणात असलेले श्री देवी तुळजाभवानी देवस्थान हे एक जाज्वल्य व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. या तुळजाभवानी देवस्थानमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही घटस्थापना रवि. दि. ११ ते दसरा मंगळ. दि. २० ऑक्टो. पर्यंत सलग १० दिवस तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव संपन्न होईल. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी देवी तुळजाभवानीची षोडशोपचार पूर्वक पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी श्री. आनंद बाबासाहेब चौघुले व सौ. उल्का आनंद चौघुले या दांपत्याने यजमानपद भूषविले. यावेळी पारंपारिक घटाची स्थापना करण्यात आली व त्यानंतर मंदिर सर्व भाविकांना दर्शन व ओटी भरण्यासाठी खुले करण्यात आले.
घटस्थापनेच्या दिवशी श्री देवी तुळजाभवानीचे दरबारात ‘श्री देवी तुळजाभवानी महिला मंडळ, रत्नागिरी’ यांचे सुश्राव्य भजन सादर करण्यात आले. यावेळी गायिका सौ. अर्चना उतेकर, हार्मोनियम श्री. प्रवीण सावंत देसाई व तबला साथ श्री. रविंद्र मुळ्ये आणि सहकारी हाते. त्यानंतर ‘श्रीराम भजन मंडळ’, श्रीराम मंदिर, रत्नागिरी यांचे बहारदार भजन संपन्न झाले. बुवा श्री. सचिन टिकेकर, श्री. सागवेकर, श्री. राम सरोलकर, श्री. रमाकांत पांचाळ, श्री. कदम, श्री. देशपांडे, श्री. सावंत, श्री. मुळ्ये, श्री. नार्वेकर, श्री. सनगरे, श्री. यादव यांनी एका मागोमाग एक भजने सादर करुन बहार उडवून दिली. मंगळ. दि. १३ ऑक्टो. रोजी रिवाजानुसार श्री देवी तुळजाभवानीची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती संपन्न होईल. त्यानंतर दु. १२ वा. श्री अनिरुद्ध महाराज उपासना ट्रस्ट, रत्नागिरी यांचे तर्फे श्री तुळजाभवानीचे स्तोत्र पठण होईल. सायं. ५ ते ७ या वेळेत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, नाट्यछटा व फॅन्सी ड्रेस कार्यक्रम श्री. विनायक हातखंबकर सर व श्री. रमाकांत पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात येईल.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना रवि. दि. ११ ऑक्टो. रोजी श्री देवी तुळजाभवानीचे दरबारात श्री विठ्ठल रखुमाई रंगीत संगीत कन्या मेळा (संयोजिका- युक्ता तथा राधा राजेश तोडणकर) हा अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आला. सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन सर्व कलावंतांना उत्स्फूर्त दाद दिली. या कन्या मेळ्यात लहानथोर सर्व कलावंतांनी अप्रतिम कलाकारी सादर केली. विविध स्पर्धांसाठी नावनोंदणी करण्याकरिता संपर्क - १) पाककला स्पर्धा (मंगळ. दि. १३ ऑक्टो.)-१) सौ. विशाखा सुर्वे-९६०४०५५६०३ २) सौ. मंदाताई चौगुले-९४२३८७५११४ २) रांगोळी स्पर्धा (सोम. दि. १९ ऑक्टो.)- १) श्री. विनायक हातखंबकर सर-९९७०३२३५४५ २) सौ. माया तांबे-९५४५२३५२२५ ३) मेहंदी स्पर्धा (सोम. दि. १९ ऑक्टो.)- १) सौ. यज्ञा वीरकर-९९७०५६७३८३ (या स्पर्धांसाठी श्री. सुनील नलावडे-९८२२३८५०८४ यांचेकडेही नांवनोंदणी करता येईल.)




.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.